मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशानुसार रातोरात पाडला चंद्राबाबू नायडूंचा बंगला!

मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशानुसार रातोरात पाडला चंद्राबाबू नायडूंचा बंगला!

नवी दिल्ली – आंध्र प्रदेशचे मुख्यंमत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानुसार माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा ‘प्रजा वेदिका’ हा अलिशान बंगला रातोरात पाडण्यात आला आहे. शनिवारी रेड्डी सरकारने नायडू राहत असलेली ही इमारत ताब्यात घेतली. सोमवारी जगनमोहन रेड्डींनी याच इमारतीत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या निर्णयाची घोषणा केली होती.‘प्रजा वेदिका ही इमारत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नियमांचे उल्लंघन करुन बांधली होती. त्यामुळे या अवैध इमारतीविरोधात कारवाई करुन अवैध बांधकामांविरोधातील अभियान राबवले जात असलंयाचं जगनमोहन रेड्डी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आतापर्यंत या इमारतीत चंद्राबाबू राहत होते. हा बंगला बांधण्यासाठी तब्बल पाच कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. चंद्राबाबू नायडू या ठिकाणीच पक्ष नेत्यांच्या बैठकी घेत असत. काही दिवसांपूर्वीच चंद्राबाबूंनी मुख्यमंत्री रेड्डी यांना पत्र लिहून ही इमारत पाडू नये व या इमारतीस विरोधी पक्ष नेत्याचे शासकीय निवासस्थान घोषित करावे, अशी मागणी केली होती. परंतु हा बंगला अनधिकृत असल्यामुळे तो पाडण्यात आला आहे.

COMMENTS