मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर मुंडेंनी केलेल्या खुलासानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित महिलेने महिलेने आपण एकटी पडली असून पोलीस एफआयआर दाखल करत नसल्याची तक्रार केली आहे. याप्रकरणी सरकार पोलिसांवर दाबाव आणत असल्याची चर्चा रंगत आहे.
मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलाही हीने अनेक लोकांना अशा प्रकार आल्या जाळ्यात अडकवल्याची इतरांनी आरोप केला आहे. त्यामध्ये भाजपचे नेते कृष्णा हेगडे, मनसे मंगेश धुरी आणि इतर काही लोकांनाही संबंधित महिलेने अशाच पध्दतीने अडकवून पैशांची मागणी केल्याची तक्रार केली.
एकूण हे प्रकरण सरकार आणि अनेक नेत्यांना अडचणीत आणणारे ठरणार असून त्याबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली असून कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री असं म्हणत सूचक विधान केलं आहे.
अनिल देशमुख यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संबंधित पीडित महिला आपला जबाब नोंदवला जात नसल्याची तक्रार करत असून एफआयआर दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्यासंबंधी अनिल देशमुख यांना विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले की, “कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही. आमचं पोलीस खातं योग्यप्रकारे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य प्रकारे कारवाई करेल”.
COMMENTS