अनिल देशमुख यांनी सोडलं तब्बल आठ दिवसानंतर मौन

नागपूर: सोशल मिडिया स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अनिल देशमुख यांनी तब्बल आठ दिवसानंतर मौन सोडलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत. पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. चौकशी अहवाल आल्यावर सत्य निष्पन्न होईल, असं देशमुख यांनी सांगितलं.

विरोधक करत असलेला आरोप चुकीचा आहे. वन मंत्री संजय कराठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणी राठोड यांचीही चौकशी होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

पूजा चव्हाण प्रकरणी राठोडा यांचा राजीनामा घेऊन नंतरच त्यांची चौकशी करावी अशी मागणी विरोधक करत आहेत, असं देशमुख यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार त्याबाबतचा निर्णय घेईल.

यावेळी देशमुख यांनी त्यांनी सेलिब्रिटी ट्विटच्या चौकशीच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं सांगितलं. मी सेलिब्रिटींच्या ट्विटच्या चौकशीचे आदेश दिलेच नव्हते. तर भाजपच्या आयटी सेलची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपच्या आयटी सेलमधून कशा प्रकारचे ट्विट केले गेले याची चौकशी करण्याचे हे आदेश होते, असं त्यांनी सांगितलं. लता मंगेशकर या दैवत आहेत. तर सचिन तेंडुकरला देशातील प्रत्येक व्यक्ती मानतो. त्यामुळे त्यांच्या ट्विटच्या चौकशीचा प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

COMMENTS