धुळे – धुळ्यातील भाजप आमदार अनिल गोटे यांचा बंड कायम असून स्वाभिमानी भाजप आणि लोकसंग्रामच्या नावाने महापालिकेची निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. अनिल गोटे यांनी आमदार पदाचा राजिनामा देणार नसल्याचं कालच जाहीर केलं आहे.मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. परंतु गोटे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे धुळे महापालिका निवडणुकीत भाजप विरुध भाजप असा सामना रंगणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर नाराजी व्यक्त करुन गोटे यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला होता. तसेच पक्षात गुंडांना प्रवेश दिला जात असल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करणाऱ्या लोकांना पक्षात स्थान दिला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी गोटे यांच्या अटी मान्य करत त्यांची नाराजी दूर केली होती. त्यामुळे त्यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आहे. परंतु महापालिकेची निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे.
COMMENTS