…तर डॉ. सुभाष भामरेंनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी – अनिल गोटे

…तर डॉ. सुभाष भामरेंनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी – अनिल गोटे

मुंबई – महापौरपदाची लालसा असल्यामुळे अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं वक्तव्य डॉ. सुभाष भामरे यांनी केलं होतं. भामरे यांच्या वक्तव्याला आमदार अनिल गोटे यांनी प्रत्युत्तर दिलं असून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे बालिशपणे काहीही बडबडत असल्याचं गोटे यांनी म्हटलं आहे. तसेच  आमदारकी सोडून मला महापौरपदाची लालसा आहे, तर मग डॉ. भामरे यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी, असा टोलाही गोटे यांनी भामरेंना लगावला आहे. याबाबतची बातमी ‘प्रहार’नं दिली आहे.

दरम्यान महापौर पदापेक्षा आमदार पद कधीही मोठे असते ही क्षुल्लक बाब दुर्लक्षित करून डॉ. भामरे बालिश आरोप करत आहेत असा टोलाही अनिल गोटे यांनी लगावला आहे. तसेच  आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय मी जाहीर केला असला तरी त्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री अथवा पक्षातील अन्य कुणीही मला संपर्क केलेला नाही. त्यामुळे येत्या 19 नोव्हेंबरला मी पदाजा राजीनामा देणार असल्याचा पुनरुच्चारही गोटे यांनी केला आहे.

 

COMMENTS