शिवसेनेचे अनिल परब यांचे विधानपरिषदेत सनसनाटी आरोप !

शिवसेनेचे अनिल परब यांचे विधानपरिषदेत सनसनाटी आरोप !

नागपूर – शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी अधिका-यांवर सनसनाटी आरोप केले आहेत. मुंबई पालिका निवडणुकीत जात पडताळणीसाठी 50 लाखांची मागणी केली असल्याचा आरोप परब यांनी केला आहे. आज विधानपरिषदेत जातीय प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा विधेयकावर चर्चा करत असताना अनिल परब यांनी हे आरोप केले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पैशांची मागणी केली असल्याचा आरोप परब यांनी केला आहे.

दरम्यान ज्या अधिकाऱ्यांनी पैसे मागितले त्यांची चौकशी करण्याची मागणी अनिल परब यांनी केली असून चौकशी समितीसमोर मी जायला तयार असल्याचंही परब यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्याकडे त्याबाबत पुरावे असून जात वैधता प्रमाणपत्र वेळेत दिले जात नाहीत. पैसे मागणाऱ्या जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या अशा अधिकाऱ्यांच्या चारित्र्याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच मंत्र्याचे नाव घेऊन पैसे मागितले गेले असल्याचा आरोप करत याबाबतची कल्पना नंतर संबंधित मंत्र्याला दिली असल्याचीही माहिती परब यांनी दिली आहे.

COMMENTS