मनसे सुपारीवर चालणारा पक्ष, नागड्याबरोबर उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ते कदाचित पुढे दिसेल, अनिल परब यांचा खळबळजनक आरोप ! पाहा

मनसे सुपारीवर चालणारा पक्ष, नागड्याबरोबर उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ते कदाचित पुढे दिसेल, अनिल परब यांचा खळबळजनक आरोप ! पाहा

मुंबई – राज ठाकरे यांचा मनसे पक्ष येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपबरोबर युती करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने मनसेवर गंभीर आरोप केलेत. मनसे भाजपबरोबर जाणार ही बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे मला माहीत नाही. मात्र मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू शकत नाही, असे सांगत मनसे हा सुपारीवर चालणारा पक्ष असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलाय.

मनसेला कुणाची तरी सुपारी घ्यावीच लागेल. त्यांच्या पक्षाचं अस्तित्वच त्याच्यावर आहे. आज ना उद्या कुणाची तरी सुपारी घ्यायची आहे. वेगवेगळ्या पक्षांची सुपारी घेऊन झाली. आता ज्या भाजपच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणून उघडं नागडं केलं. आता त्याच नागड्याबरोबर उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ते कदाचित पुढे दिसेल, अशी खिल्ली अनिल परब यांनी मनसेची उडवली आहे.

हे काय चाललंय ती वेगवेगळी समीकरणं असतील तरी मुंबई महापालिका निवडणुकीला आम्ही समर्थपणे समोरं जाऊ आणि मला विश्वास आहे आम्ही निवडणूक जिंकू. तसेच मुंबई महापालिका निवडणूक कशी लढवली जाणार याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. पण मुंबईत शिवसेनेला वेगळी निवडणुकीची तयारी करावी लागत नाही. आम्ही नेहमीच हे काम करत असतो. शिवसेना हा पक्ष निवडणुकांसाठी जन्माला आलेला पक्ष नाही. 365 दिवस काम करणारा हा पक्ष आहे. आम्ही दररोज लोकांची कामं करत असतो, लोकांना दररोज भेटत असतो. महापालिका निवडणूक एकत्र लढवायची की नाही याचा निर्णय तीनही पक्षाचे प्रमुख मिळून घेतील असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.

दरम्यान 7 डिसेंबरच्या आधी कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे. त्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाचा आढावा घेतला जाईल, सर्व गोष्टींचा विचार केला जाईल आणि मगच निर्णय घेतला जाईल. 7 डिसेंबरला अधिवेशन घ्यायचं ठरलं आहे, मुंबईत घ्यायचं ठरलं आहे. 7 डिसेंबरला अधिवेशन घ्यायचं की पुढे ढकयालचं याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला जाईल असंही परब यांनी म्हटलं आहे.

COMMENTS