एसटी बसच्या प्रवाशांसाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी घेतला “हा” निर्णय!

एसटी बसच्या प्रवाशांसाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी घेतला “हा” निर्णय!

मुंबई – प्रवाशांच्या तक्रारी अथवा समस्यांचे तातडीने निरसन करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये, ती बस ज्या आगाराची आहे, त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक व त्या विभाग प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक ठळकपणे प्रदर्शित करावे असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष  ॲड. अनिल परब यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.

मंत्री, ॲड. अनिल परब म्हणाले की, ” दररोज एसटीने सुमारे६७ लाख प्रवासी प्रवास करतात. सुरक्षित प्रवासाबरोबरच प्रवाशांना सौजन्यशील सेवा देणे हे एसटी महामंडळाचे प्रमुख ध्येय आहे. ” एसटीच्या प्रवाशांना प्रवासामध्ये काही समस्या उद्भवल्यास अथवा प्रवासी सेवेबाबत काही सूचना द्यावयाची असल्यास सध्या त्यांना संपर्क करण्यास अडचणी येत आहेत. सेवा क्षेत्रामध्ये काम करीत असतांना, *ग्राहकाचे महत्तम समाधान* हेच ‍अंतिम उद्दिष्ट्य असले पाहिजे. “ग्राहकाच्या तक्रारी,समस्या आणि सूचनांचे निराकरण त्या -त्या पातळीवर तातडीने होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधीत आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक यांनी आपले उत्तरदायित्व ओळखून प्रत्येक प्रवाशाच्या तक्रारी अथवा समस्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे”.प्रवासी सेवांचा दर्जा उंचावणे व अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चालक-वाहकांच्या बरोबरच अधिकाऱ्यांनी देखील प्रवाशांच्या समस्या जाणून त्याचे तातडीने निरसन करणे महत्वाचे आहे,असे ही ते म्हणाले.  एसटी बसमध्ये आगार प्रमुख व विभाग प्रमुखांचा दुरध्वनी क्रमांक प्रदर्शित करण्याबाबतचे परिपत्रक लवकरच एसटी प्रशासनाकडून निर्गमित करण्यातयेत आहे.

COMMENTS