ट्रॅक्टर रॅलीत अण्णा हजारे

ट्रॅक्टर रॅलीत अण्णा हजारे

अहमदनगर : राजनाधी नवी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धी येथे ट्रॅक्टर रॅलीला हिरवा झेंडा दाखवून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहभाग दर्शवला. प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर शहरातून शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्याने तिरंगा रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा दिला. संघर्ष समन्वय समिती बरोबरच विविध संघटना आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेऊन केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध केला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर आणि त्यांच्या प्रश्नावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, असं आवाहन अण्णा हजारे यांनी यावेळी केले.

COMMENTS