अहमदनगर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी ग्रामविकास विभागाने घटनाबाह्य परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. जर हा निर्णय झाला तर आंदोलन करु, अशा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला आहे.त्याचबरोबर राज्यात पक्षाची, पक्षाने, पक्ष सहभागातून चालविलेली शाही येऊन लोकशाही पायदळी तुडविली जाणार असं मत अण्णांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांचा सल्ला घ्यावा. तसेच ग्रामविकास विभागाने घटनेची आणि कायद्याची पायमल्ली करुन घटनाबाह्य परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल केली आहे, हा निर्णय घेणाऱ्या मंत्र्याचा गृहपाठ कच्चा राहिला आहे. त्यामुळे त्यांना कायदा, घटना यांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचा सल्ला अण्णा हजारे यांनी या पत्रात दिला आहे.तसेच घटनेत पक्ष पार्टीचा उल्लेख कुठेही नसून ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे अधिकार पालकमंत्र्यांना देऊन पक्ष पार्टीच्या माणसांचा हस्तक्षेप होणे बेकायदेशीर आहे हे नाकारता येत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
राज्यातील 19 जिल्ह्यातील एक हजार 566 ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून 2020 दरम्यान समाप्त झाली आहे. तर 12 हजार 668 ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर 2020 च्या दरम्यान समाप्त होत आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर संबंधित गावातील व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळा पत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य होत नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात अनेकांनी राज्य सरकारवर टीका केली होती.
त्यानंतर आता यावर अण्णा हजारेंनी टीका केली असून ग्रामविकास विभागाने घटनेची आणि कायद्याची पायमल्ली करुन घटनाबाह्य परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल केली आहे, हा निर्णय घेणाऱ्या मंत्र्याचा गृहपाठ कच्चा राहिला आहे. त्यामुळे त्यांना कायदा, घटना यांचा अभ्यास कटरणे आवश्यक असल्याचा सल्ला अण्णा हजारे यांनी दिला आहे.
COMMENTS