अण्णा हजारेंचा सक्रीय कार्यकर्ता व्हायचंय, तर तुम्हाला करावा लागणार करार !

अण्णा हजारेंचा सक्रीय कार्यकर्ता व्हायचंय, तर तुम्हाला करावा लागणार करार !

नवी दिल्ली – अण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभागी होऊन तुम्हाला त्यांचा सक्रीय कार्यकर्ता व्हायचं असेल तर यापुढे करार करावा लागणार आहे. याबाबतची माहिती अण्णा हजारे यांनी दिली असून २३ मार्च रोजी जंतरमंतर ते आंदोलन करणार आहेत. मी समाजाच्या हितासाठी आंदोलन करतो त्यामुळे यापुढे माझ्या आंदोलनातून नेते निर्माण होणार नाहीत असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. यापुढे माझ्या आंदोलनात कोणत्याही व्यक्तीला सहभागी होता येणार आहे मात्र आंदोलन झाल्यावर त्या व्यक्तीला कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी होणार नसून त्या व्यक्तीला लेखी करार लिहून द्यावा लागणार असल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये भारतीय मतदार संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान यूपीए सरकारच्या काळात जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी देशव्यापी चळवळ उभी केली होती. हे आंदोलन संपल्यावर अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी हा पक्ष स्थापन केला. तसेच याच पक्षाने दिल्लीची सत्ताही मिळवली. ही बाब अण्णा हजारे यांना मुळीच रूचलेली नाही. त्यांनी तसे बोलूनही दाखवले होते. मात्र आगामी काळात माझ्या आंदोलनातून नेते निर्मिती होणार नाही, तसा करारच मी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांकडून करून घेणार आहे असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

COMMENTS