अहमदनगर – 2014मध्ये भाजपने माझा वापर केला असल्याचं वक्तव्य अण्णा हजारे यांनी केलं आहे. मागण्यांबद्दल कोणताही निर्णय लेखी स्वरुपात द्या अशी मागणीही अण्णांनी केली आहे. दरम्यान, सत्ता बदलून फायदा नाही तर त्यासाठी व्यवस्था बदलणं आवश्यक असल्याचं अण्णा हजारे म्हणाले आहेत. राळेगणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
दरम्यान भाजपच्या नेत्यांना लोकपालची ऍलर्जी झाली असल्याचंही अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. तसेच सत्ता बदलली तरी परिवर्तन होणार नसल्याचंही यावेळी अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. सत्तेपक्षा व्यवस्था बदलनं गरजेचं असल्याचंही अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. तसेच सहा दिवसांच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून डॉक्टरांनी अण्णांना बोलू नये असा सल्ला दिला आहे.
COMMENTS