अहमदनगर – राळेगणसिध्दी येथे आजपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सुरु केले होते. परंतु जनलोकपाल आणि शेतक-यांच्या प्रश्नांसाठी सुरू होणारे उपोषण अण्णा हजारेंनी थांबवले आहे. मंत्री गिरीश महाजन आणि अण्णा हजारे यांच्यात झालेले चर्चेनंतर अण्णा हजारेंनी उपोषण थांबवले आहे. महाजन आणि अण्णा यांच्या सकारात्मक चर्चा झाली असून 90 % टक्के मागण्या मान्य झाल्याने अण्णांनी अपोषण थांबवले असल्याची माहिती आहे. परंतू मागण्या पुर्ण न झाल्यास 30 जानेवारीला महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी देशभर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा अण्णांनी दिला आहे.
COMMENTS