मुंबई – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या 385 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंबंधित फाईल्स लंपास झाल्या असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या फाईल्स लंपास करणाऱ्यांमध्ये घोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांचा भाऊ असल्याची माहिती मिळत आहे. महामंडळाच्या कार्यालयाचं सील तोडून काही फाईल्स पळविण्यात आल्याची तक्रार दहिसर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. परंतु या फाईल्स साठे महामंडळ घोटाळ्याच्या आहेत की इतर कोणत्या आहेत याबाबतची अधिक माहिती समजू शकलेली नाही.
दरम्यान दहिसरमधील सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीत या फाईल्स ठेवण्यात आल्या होत्या. या इमारतीतून या फाईल्स लंपास करण्यात आल्या असल्याचं बोललं जात आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यावर ढोबळेंनी थेट आरोप केला आहे.
COMMENTS