दिल्ली – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र सदनला ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत ते सरकाविरोधातील आंदोलनाची रुपरेषा घोषित करण्याची शक्यता आहे. अण्णा हजारे यांनी याबाबत पत्रक काढून पत्रकार परिषदेविषयी माहिती दिली आहे.
अण्णा हजारे यांनी मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून विविध प्रश्नांवर मोदींना पत्र लिहिली. आतापर्यंत 30 पत्रे लिहिली. मात्र मोदींनी त्याला उत्तर देण्याची तसदी दाखवली नाही. असा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे. त्यामुळेच सरकारविरोधात आता लढाईसाठी त्यांनी पत्रकार परिषद बोलवली आहे.
2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर येण्यासाठी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची मोठी मदत भाजपला झाली होती. तसंच अरविंद केजरीवाल हेही अण्णांच्या आंदोलनातून पुढे आले होते. भाजपनं अप्रत्यक्षपणे गेल्यावेळी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आता त्यांच्याच विरोधात अण्णा आंदोलन करत आहेत. त्याला आता कसा प्रतिसाद मिळतो ते पहावं लागेल.
COMMENTS