नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती बिघडली असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन दीक्षित हे रुग्णालयात दाखल झाले आहेत.
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून अरुण जेटलींची तब्येत खराब असल्याने, त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कॅबिनेट मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपला निर्णय कळवला होता. शिवाय, ट्विटरवर देखील त्यांनी माहिती दिली होती की, मागील १८ महिन्यांपासून मी आजारी आहे. माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्री पदासाठी विचार केला जाऊ नये.
सध्या जेटलींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. एंडोक्रायनोलॉजिस्ट, हृदयरोग आणि मूत्रपिंड विसेषज्ञ त्यांच्यावर उपचार करत आहेत.
COMMENTS