नवी दिल्ली – अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन टीका केली आहे. राहुल गांधी प्रत्येक भाषणात राफेल विमानाची वेगवेगळी किंमत सांगतात. आतापर्यंत त्यांनी राफेल विमानाच्या सात वेगवेगळ्या किमती सांगितल्या आहेत’, असं जेटली म्हणाले. काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून दिले जाणारे तर्क प्राथमिक शाळेतील मुलासारखे आहेत. 2007 मध्ये करण्यात आलेल्या करारापेक्षा 2015 मध्ये करण्यात आलेला करार कित्येक पटींनी चांगला असल्याचं जेटली यांनी म्हटलं आहे.
Every fact that they (Congress) have said on pricing is factually false. Mr Rahul Gandhi himself has given 7 different prices in different speeches with regard to the 2007 Rafale offer: FM Arun Jaitley (File pics) #FMtoANI pic.twitter.com/b15l6ZWAY9
— ANI (@ANI) August 29, 2018
दरम्यान राहुल गांधी यांनी केलेला राफेल विमान खरेदी संदर्भातील आरोप पूर्णपणे चुकीचे आणि तथ्यहीन आहेत. आम्ही एका राफेल विमानासाठी 500 कोटीपेक्षा थोडे जास्त देत होतो आणि मोदी सरकार त्याच विमानासाठी 1600 कोटी रुपयांपेक्षा थोडी जास्त रक्कम मोजत आहेत, अशा शब्दांमध्ये राहुल गांधी बोलतात. यावरुन त्यांची समज लक्षात येते असंही अरुण जेटली यांनी म्हटलं आहे.
COMMENTS