पुणे पदवीधरमधून अरुण लाड यांच्या उमेदवारीचे शरद पवारांचे स्पष्ट संकेत !

पुणे पदवीधरमधून अरुण लाड यांच्या उमेदवारीचे शरद पवारांचे स्पष्ट संकेत !

सांगली – पुणे पदविधर मतदारसंघातून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी क्रांती उद्योग समुहाचे प्रमुख अरुण अण्णा लाड यांना देण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. गेल्यावेळी झालेली चूक यावेळी दुरुस्त करु असंही पवार म्हणाले. गेल्यावेळी ऐनवेळी अरुण अण्णा लाड यांची उमेदवारी कट करुन माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या मुलाला उमेवारी दिली होती.

क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण अण्णा लाड यांचा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अरुण अण्णा लाड यांच्या 70 व्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यास, राष्ट्रवादी आणि भाजपाचे अनेक नेते कुंडल मध्ये एका व्यासपीठावर आले होते.

क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण अण्णा लाड याना विधानपरिषदेचे उमेदवारी मिळाली, तर आम्ही पक्षभेद विसरून त्यांच्या मागे नक्की राहू अशा शब्दात भाजपचे सांगली भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी अरुण लाड यांच्या उमेदवारीचं समर्थन केलं.

गेल्यावेळी अरुण लाड यांचं तिकीट ऐनवेळी कापल्यानं त्यांनी बंडखोरी केली होती. तिरंगी लढतीचा फायदा विद्यमान महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना झाला होता. निसटत्या मतांनी चंद्रकांत पाटील विजय झाले होते.

गेल्यावेळच्या मतदानाची आकडेवारी खालील प्रमाणे…..

चंद्रकांत दादा पाटील (भाजप –  54, 500)

सारंग श्रींनिवास पाटील (राष्ट्रवादी  52, 000)

अरुण अण्णा लाड (अपक्ष- बंडखोर – 48,000 )

 

COMMENTS