भारतीय बँकांना हजारो कोटींचा चुना लावून देशाबाहेर पळालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याच्या याच्या वक्तव्यावरुन भारतीय राजकारणात भूकंप झाला आहे. विजय मल्ल्या देशाबाहेर जाण्याच्या आधी आपली केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यानंतरच आपण देशाबाहेर गेल्याचं विजय मल्ल्या याने सांगितलं होतं. त्यावरुन विरोधी पक्षांनी जेटली आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यानंतर विजय मल्ल्या याने पुन्हा लंडनमध्ये आपली जेटलींसोबत अशी औपचारीक बैठक झाली नाही. माध्यमांनी आपल्या विधानाचा विपर्यास केला. बैठक झाली नाही मात्र आपण लंडनला जात आहे असं जेटलींना सांगिंतलं होतं असंही मल्ल्या याने स्पष्ट केलं आहे.
संसदेमध्ये अरुण जेटली यांनी या विषयावर निवेदन केलं तेंव्हा त्यांनी ही माहिती संसदेला द्यायला हवी होती पण त्यांनी ती लपवली असा घणाघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी केला आहे. तर आपण दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि विजय मल्ल्या यांची बैठक झाल्याचं पाहिलं होतं असा दावा काँग्रस नेते पी. एल. पुनिया यांनी केला आहे. त्या दिवसाचं सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यानंतर ते स्पष्ट होईल असंही पुनिया म्हणाले.
I saw both Arun Jaitley and Vijay Mallya having a discussion in the Central Hall of the Parliament. This can be can verified with CCTV footage from that day: PL Punia, Congress pic.twitter.com/eltNNKizfs
— ANI (@ANI) September 12, 2018
विजय मुल्ल्या याने लंडनमध्ये अंत्यत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करायला हवी अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गाधी यांनी केली आहे. तसंच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा अशी माहणीही राहुल गांधी यांनी केली आहे.
Given Vijay Mallya’s extremely serious allegations in London today, the PM should immediately order an independent probe into the matter. Arun Jaitley should step down as Finance Minister while this probe is underway, tweets Rahul Gandhi (File pic) pic.twitter.com/s2jnkoAjZT
— ANI (@ANI) September 12, 2018
COMMENTS