नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माफी मागितली आहे. मानहानीच्या प्रकरणाबाबत केजरीवालांनी माफी मागितली असून केजरीवाल यांनी नितीन गडकरी यांना पत्र लिहून केलेल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत केस बंद करण्याचा आग्रह केला होता.त्यानंतर दोन्ही नेत्यांनी सहमतीने केस बंद करण्यासाठी कोर्टात अर्ज केला असून अरविंद केजरीवालांच्या माफीनाम्यानंतर नितीन गडकरींनी पटियाला हाऊस कोर्टातील मानहानीचा खटला मागे घेतला असल्याची माहिती आहे.
दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी भारतातील सर्वात भ्रष्ट लोकांच्या यादीत नितीन गडकरी यांचा सहभाग असल्याचं वक्तव्य केलं होतं. केजरीवाल यांच्या या वक्तव्यावर नाराज होऊन नितीन गडकरी यांनी केजरीवालांवर मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर आपकडून नितीन गडकरी यांना पाठविलेल्या पत्रात केजरीवालांनी ‘माझं तुमच्याशी काहीही वैयक्तिक भांडण नाही, आधी केलेल्या वक्तव्यावर मी तुमची माफी मागतो’ असं म्हटलं आहे. केजरीवालांच्या माफीनाम्यानंतर अखेर गडकरींनी त्यांना माफ केलं असून त्यांच्यावर दाखल केलेला खडला अखेर मागे घेण्यात आला आहे.
COMMENTS