मुंबई – मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. आज सकाळी आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या कृष्णकूंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. परंतु या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान काही काळापासून राज ठाकरे भाजपवर जोरदार टीका करत असताना शेलार यांनी त्यांची भेट घेतली असल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच राज यांची राजकीय खेळी वेगळी असल्याचे चित्र देवरुख नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले. रत्नागिरीत नगरपंचायत निवडणुकीत भाजप-मनसे युती दिसून आली. त्यामुळे देवरुखमध्ये शिवसेनेला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे राज ठाकरे यांची मनसे चांगलीच चर्चेत आली आहे..
त्यानंतर आज आशिष शेलार यांनी राज यांच्या निवासस्थानी जाऊ भेट घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात राजयकीय वर्तुळात मोठे फेरबदल पहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच राजापूर येथील नाणार प्रकल्पाबाबत राज ठाकरे यांनी जातीने लक्ष घातले आहे. त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला असून आम्ही ग्रामस्थांच्या पाठिशी आहोत, असे स्पष्ट केलं आहे. तसेच शिवसेना, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनीही नाणार प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबतही शेलार आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
COMMENTS