आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा !

आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा !

मुंबई – मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांनी जवळपास दोन तास चर्चा केली आहे. या बैठकीमध्ये राज यांचे पूत्र अमित ठाकरे यांच्या लग्नाविषयी चर्चा झाली असल्याची माहिती आहे. अमित यांचे येत्या 27 जानेवारीला लग्न आहे. या लग्नासाठी कोणाला बोलवायचे आणि कोणाला नाही याबाबतही चर्चा केली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान याआधीही आशिष शेलार यांनी एप्रिल 2018 मध्ये कृष्णकुंजवर जाऊन राज यांची भेट घेतली होती. तेव्हांही या दोन्ही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाली होती.वर्षभरातली ही त्यांची दुसरी भेट आहे. या दोन्ही नेत्यांच्या जवळीकतेमुळे आगामी निवडणुकीत राज ठाकरे हे भाजपला पाठिंबा देणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

COMMENTS