…तर शिवसेनेसाठी राजकीय तडजोड करायला तयार, आशिष शेलारांची खुली ऑफर !

…तर शिवसेनेसाठी राजकीय तडजोड करायला तयार, आशिष शेलारांची खुली ऑफर !

मुंबई – भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला खुली ऑफर दिली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीवरुन केवळ सरकार वाचवण्यासाठी शिवसेना भूमिका बदलत असेल, तर भाजप शिवसेनेसाठी राजकीय तडजोड करायला तयार असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा ही देशाची आवश्यकता असून लोकसभेत शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. मग राज्यसभेतून पळ काढला. त्यामुळे सरकार वाचवणं हाच जर शिवसेनेचा मुद्दा असेल, तर भाजप राजकीय तडजोड करेल असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

या कायद्याची अंमलबजावणी राज्य आणि देशहितासाठी राहील. केवळ सरकार वाचवणं या छोट्या भूमिकेतून त्याकडे बघू नका, त्यासाठी आपल्याला भूमिका बदलावी लागत असेल, तर भाजपचा नारा आहे, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि अखेर मी, त्यामुळे अशीच राजकीय तडजोडीची वेळ आली, तर भाजप नक्की सहकार्य करेल. त्यामुळे माझी सरकारला विनंती असल्याचं शेलार म्हणाले आहेत.

COMMENTS