मुंबई – २ जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणातील सर्व आरोपींना काल विशेष न्यायालयान दोषमुक्त केलं होतं. त्यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला. आज आणखी एक काँग्रेससाठी दिलासा देणारी बातमी समोर आली असून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळ्याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. सीबीआयला देण्यात आलेली चौकशीची परवानगी उच्च न्यायालयानं रद्द केली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गेल्यावर्षी आदर्श घोटाळाप्रकरणी अशोक चव्हाण यांची चौकशी करण्यास आणि त्यांच्यावर कारवाई करण्यास सीबीआयला परवानगी दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाने आज ही परवानगी रद्द केली. त्यामुळे अशोक चव्हाणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
COMMENTS