काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नाराज, राजीनामा देणार?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नाराज, राजीनामा देणार?

मुंबई  – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये काँग्रेस महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्याला माझं कोणीच ऐकत नाही, त्यामुळेच मीच राजीनामा देण्याच्या ताारीत असल्याचं म्हटलं आहे.
त्यामुळे चव्हाण हे राजीनाम्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

दरम्यान चंद्रपुरात व्हायरल झालेली ही ‘ऑडिओ क्लिप’ असून एका कार्यकर्त्याशी अशोक चव्हाण बोलत आहेत. हा कार्यकर्ता चंद्रपुरातल्या जागेबाबत बोलत असताना अशोक चव्हाण त्याला सांगत आहेत की पक्षात माझं कोणीही ऐकत नाही.

तसेच अशोक चव्हाण यांनी या क्लिपबाबत स्पष्टीकरण दिलं असून आपण ही क्लिप ऐकलेली नाही. खासगी संभाषण पब्लिक डोमेनमध्ये टाकण्याचा विषय नाही. हे सगळे अंतर्गत विषय आहेत, चंद्रपुरात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे हे माझे काम आहे  असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

COMMENTS