कराड – भाजप सरकारच्या पापाचा घडला भरला असून तो फोडण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेतला असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे. भाजप सरकारचा निषेध करत काँग्रेसनं आज हंडी फोडली आहे. भाजपच्या पापाचा घडा आता भरला असून तो फोडण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे. तसेच मोदी आणि फसणवीस सरकारच्या पापाची ही हंडी असून 2019 च्या निवडणुकीत भाजप सरकारची हंडी जनता फोडणार असल्याचं वक्तव्य चव्हाण यांनी केलं आहे.. कराडमध्ये काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा पोहचली असून त्यावेळी चव्हाण बोलत होते.
COMMENTS