आगामी निवडणुकीत नवे मित्रपक्ष जोडण्यावर भर, ‘या’ पक्षाला सोबत घेण्याची अशोक चव्हाणांनी केली घोषणा !

आगामी निवडणुकीत नवे मित्रपक्ष जोडण्यावर भर, ‘या’ पक्षाला सोबत घेण्याची अशोक चव्हाणांनी केली घोषणा !

कोल्हापूर –  काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. हातकणंगले – शिरोळ येथे आज काँग्रेसची जाहीर सभा पार पडली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी  आगामी निवडणुकीसाठी नवे मित्रपक्ष जोडण्यावर भर दिला जाणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच  खासदार राजू शेट्टी यांना सोबत घेऊन राज्यात विरोधकांची महाआघाडी केली जाणार असल्याची घोषणा चव्हाण यांनी केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकीरी संघटना महाआघाडीत सामील झाली आहे.

दरम्यान आमची आणि राजू शेट्टी यांची शेतकऱ्यांविषयी भूमिका एकच आहे. शेतमालाला हमी भाव, खत, बियाणे, इंधन आदींची वाढ याविषयी आमचे एकमत असताना आता भांडण असण्याचा प्रश्नच येत नसल्याचं यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच स्वतः शेट्टी यांनी भाजपबरोबर गेलो ही चूक झाली असे सांगितले आहे. राजू शेट्टी यांनी राहुल गांधी यांचीही भेट काही दिवसांपूर्वी घेतली. सरकार विरोधात वातावरण तयार होते आहे. याचा स्थानिक पातळीवर फायदा उचलला पाहिजे. त्यामुळे जनसंघर्ष यात्रा परिवर्तनाची नांदी झाली पाहिजे याची दक्षता घेण्याचं आवाहनही यावेळी अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

 

COMMENTS