शरद पवारांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणावर मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया !

शरद पवारांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणावर मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया !

मुंबई – मंत्री आणि मराठा आरक्षण समितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे शरद पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात बैठक झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही बैठकीला उपस्थित होते. या भेटीनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात जायचं आहे त्याची तयारी सुरू आहे, त्याबाबत शरद पवारांशी चर्चा केली. स्थगिती उठण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्याची माहिती पवारांना दिली त्यांचाशी चर्चा केली असून त्यांनीही आपली मतं मांडली आहेत असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

तसेच चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करावं कोणत्या नेत्यांना आरक्षण नको आहे. वेगवेगळी विधानं टाळून यात एक वाक्यता असायला हवी असंही चव्हाण म्हणाले आहेत. लोकल सेवा सुरू करायच्या की बंद ठेवायच्या याचा निर्णय परिस्थितीचा विचार करून घेतला जातोय. आपण न्यायालयात जातो आहेच, घटनापीठ लवकर स्थापन व्हावं यासाठी आपण मुख्य न्यायमूर्तींकडे प्रयत्न करतोय असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

COMMENTS