…त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे, अशोक चव्हाणांनी व्यक्त केली ठाकरे सरकारवर जाहीर नाराजी!

…त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे, अशोक चव्हाणांनी व्यक्त केली ठाकरे सरकारवर जाहीर नाराजी!

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्ष नाराज असल्याची चर्चा गेली काही दिवसांपासून सुरु आहे. परंतु आज
सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही, तीनही पक्षांना समान अधिकार हवेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार, असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. उद्या काँग्रेस नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते आपली नाराजी मुख्यमंत्र्यांसमोर माडणार आहेत.

दरम्यान सरकारमधील वागणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 जून रोजी मंत्री सुनील केदार यांच्या बंगल्यावर काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मंत्री वर्षा गायकवाड, सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात नाही, निर्णय प्रक्रियेत घेत नाहीत, यावर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर मंत्री
बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली होती. पक्षांमध्ये मतभेद असतात आणि प्रत्येकाला तसा अधिकारही आहे. मात्र मुख्यमंत्र्यांशी बोलून या सर्व गोष्टी आम्ही सोडवणार आहोत असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होत.

त्यानंतर आज चव्हाण यांनी ठाकरे सरकारवर थेट नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही, तीनही पक्षांना समान अधिकार हवेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार, असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

COMMENTS