मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री अशोक चव्हाणांवर सोपवली आणखी एक मोठी जबाबदारी!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री अशोक चव्हाणांवर सोपवली आणखी एक मोठी जबाबदारी!

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आणखी एक जबाबदारी सोपवली आहे. चव्हाण यांच्यावर मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री आणि सचिवांची बैठक घेऊन शासनाला प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीकडेच सोपवण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भाजपला चोख प्रत्युत्तर दिले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मराठा आरक्षण विषयक उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांना हटवावे. अशोक चव्हाण यांच्याऐवजी मंत्री एकनाथ शिंदे किंवा इतर सक्षम मंत्र्याची अध्यक्षपदी नियुक्त करावी, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी केली होती. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचं सोंग करतंय. त्यामुळं सरकारला जागं करावं लागणार आहे. त्यासाठी आंदोलन करावंच लागणार असल्याचं मेटे म्हणाले होते.

COMMENTS