मुंबई – राज्यातील सरकारी कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची मागणी राज्य शासनाकडे प्रलंबीत आहे. यासाठी कर्मचा-यांच्या विविध संघटनांकडून सरकारकडे मागणी केली जात आहे. परंतु सरकानं या मागणीकडे दुर्लक्ष केलं असल्याचं चव्हाण म्हणाले आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी त्रिपुरा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेत आल्यास शासकीय कर्मचा-यांना तात्काळ सातवा वेतन आयोग लागू करण्याचं आश्वास दिलं आहे. निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही एका राज्याला सातवा वेतन आयोगाचं गाजर दाखवत आहात तर महाराष्ट्रात सत्ता असतानाही सातवा वेतन आयोग का लागू केला जात नाही असा सवाल खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.
COMMENTS