सत्ताधा-यांनी मला खटल्यात गोवण्याचा प्रयत्न केला –अशोक चव्हाण

सत्ताधा-यांनी मला खटल्यात गोवण्याचा प्रयत्न केला –अशोक चव्हाण

मुंबई – आदर्श घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांना उच्च न्यायालयानं शुक्रवारी दिलासा दिला आहे. राज्यपालांनी सीबीआयला  दिलेली अशोक चव्हाण यांच्या चौकशीची परवानगी उच्च न्यायालयानं रद्द केली आहे. याबाबत खासदार अशोक चव्हाण यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. तसेच राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी सत्ताधारी पक्षानं डाव घातला असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे.

दरम्यान सीबीआयकडे कोणतेही नवीन पुरावे नसताना राज्यपालांना हाताशी धरून मला या खटल्यात गोवण्याचं काम करण्यात येत होतं. परंतु न्यायालयाने सत्याच्या बाजूने निर्णय घेतला. त्यामुळे मी पूर्ण समाधानी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. आदर्श प्रकरणासंदर्भात यापूर्वीच आपल्या विरोधात खटला चालविण्यासाठी राज्यपालांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे पुन्हा खटला भरण्यास परवानगी मिळाली असती, तर हा चुकीचा पायंडा पडला असता. न्यायालयाने वस्तुस्थिती समजून घेत दिलेला निर्णय समाधानकारक असल्याचे चव्हाण म्हणाले.

COMMENTS