मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न -अशोक चव्हाण

मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न -अशोक चव्हाण

नांदेड – मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकांमधील नांदेडचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी केला आहे. नांदेडमधील भोकरमध्ये आयोजित सभेत चव्हाण बोलत होते. तसेच
पक्षातील एखादा कार्यकर्ता चुकीचं वागत असेल, तर मी निवडणुकीनंतर त्यांना शिक्षा करेन, पण तुम्ही वड्याचे तेल वांग्यावर काढू नका, त्यांच्यावरील रागाची शिक्षा मला देऊ नका, असं आवाहन अशोक चव्हाण यांनी यावेळी मतदारांना केलं.

दरम्यान केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे. दोन्ही सरकार जाणीवपूर्वक काँग्रेस असलेल्या ठिकाणची विकासकामं रोखत आहेत. सरकार मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होत आहे. पण मी तुमचा आहे, मी तुमच्यातच राहणार आणि तुमच्यातच मरणार असल्याची भावनिक साद अशोक चव्हाणांनी मतदारांना घातली.

COMMENTS