मुंबई – लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी पराभवाला एकटे राहुल गांधी जबाबदार नाहीत.सर्वांची जबाबदारी आहे. त्यांनी परिश्रम घेतले. ज्या राज्यात पराभव झाला त्या राज्यातील पदाधिका-यांचे राजीनामे घ्यावेत. मी सुध्दा राजीनामा देण्यास तयार आहे असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पक्षानं नवीन टीम बनवण्यास मोकळीक द्यावी. महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी माझी. मी कोणावर दोष देत नाही. काँग्रेस पक्षात कसलीही धुसफुस नाही. सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेतले. तसेच पक्षविरोधी काम केलेल्यांवर कारवाई करू असही चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच याबाबतचा अहवाल मागवला आहे. वंचित आघाडीमुळे 9-10 जागांवर फटका बसला आहे. वंचित भाजपची बी टीम असून फायदा भाजपालाच झाला असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच
लोकसभा विधानसभा विषय वेगळा असून हेच विधानसभेत असणार नसल्याचंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
COMMENTS