मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी उत्तर काल दिलं होतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसोबत रात्रंदिवस फिरणारेच आम्हाला घ्या म्हणून फोन करत असल्याचा दावा महाजनांनी केला. त्यावर आज अशोक चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे.
त्यांना काय म्हणायचं त्यांना म्हणू द्या. आज सत्तेची धुंद त्यांच्या डोळ्यासमोर असल्याने त्यांना दुसरं काही दिसत नाही. पण मला तसं काही दिसत नाही. जी मंडळी पक्षाच्या विचाराने बाधलेली आहेत, पक्षासाठी ज्यांनी आतापर्यंत काम केलंय ते पक्ष सोडून जातील असं मला वाटत नाही. उलट भाजप लोकशाहीला हरताळ फासत असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान विविध राज्यातील पक्ष फोडाफोडीचं काम, लोकांनी निवडून दिलेलं सरकार अस्थिर करण्याचं काम सुरू आहे. लोकांना आमिषं दाखवलं जात आहे. त्यामुळे आता भाजपाचा मुकाबला करण्यासाठी तत्त्ववादी पक्षांनी आपली बांधणी करण्याची गरज असल्याचं चव्हाण यांनी आहे.
राष्ट्रवादीबरोबरच्या आघाडीबाबत काय म्हणाले चव्हाण ?
अनेक मतदारसंघातील उमेदवारांनी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने काम केल्याची तक्रारी केल्या आहेत. स्वाभाविक आहे उमेदवारांची जी नाराजी आहे ती त्यांनी व्यक्त केली आहे
याचा अर्थ काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आघा्डी करणार नाही असा नाही. आघाडी करण्याबाबत आमची भूमिका सकारात्मक आहे. त्याबाबत चर्चा व्हायची आहे.
तसेच बॅलेट पेपरवर निवडणूक होत नसेल तर बहिष्कार घालावा या प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर काँग्रेस पक्षासहित दिल्लीत अनेक वेळा निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ जाऊन आलं आहे. ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरचा वापर करावा अशी काँग्रेसची भूमिका आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएमच्या तक्रारी आहेत, हॅकिंगबाबत तक्रारी आहेत. निकालाबाबत शंका आहे. पारदर्शकता आणा, बॅलेट पेपॉर पुन्हा आणा आणि जनतेचा जो कौल असेल तो मान्य करू.सर्वांची भूमिका आंदोलनाची आहे, पण प्रत्येक पक्ष पातळीवर याबाबत निर्णय व्हायला हवा असही चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या मराठवाड्यातील घोषणांबाबतही चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावर भरपूर घोषणा करण्याकरता आहेत. सरकारच्या हातात आता दोन महिने शिल्लक आहेत.त्यामुळे आता पाहिजे त्या घोषणा होऊ शकतात असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
COMMENTS