नांदेड – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीतील मित्रपक्षांच्या पहिल्या संयुक्त प्रचार सभेला आज नांदेडमध्ये सुरुवात झाली आहे.या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, मानिकराव ठाकरे, नसीम अहमद खान हे उपस्थित आहेत.
यावेळी बोलत असताना अशोक चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. सेना भाजपा धर्मान्ध शक्तीला विरोध करण्यासाठी आम्ही सर्व सज्ज झालो आहोत. आगामी काळात सत्ताबदल झाला पाहिजे. बहोत हो गयी जुमलों की मार आओ बदले मोदी सरकार असा नारा यावेळी चव्हाण यांनी दिला आहे.
दरम्यान सत्तेवर बसलेल्या विद्यमान लोकांना खाली खेचलं पाहिजे यासाठी 70 % लोकांना एकत्र आणण्यासाठी महाआघाडी भाई और बहनो भाई भी परेशान और बहेन भी परेशान आहे अशी टीका केली आहे. शेतक-यांकडे कर्जमाफी पोहोचलीच नाही. लहान लहान मूली अन्नत्याग करताहेत.
यावेळी बोलत असताना चव्हाण यांनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली आहे. शिवसेनेचा स्वाभिमान गेला चुलीत,टायगर ज़िंदा नहीं टायगर अब लाचार है, नोटबंदीचा फ़ायदा कुणाला झाला, काळा पैसा परत आला नाही. राफेलचा भ्रष्टाचार सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.
एकेकाळी आपलं राज्य सर्व बाबतीत अग्रेसर होतं पण आता पीछेहाट होत आहे. राहुल गांधी, पवार साहेब मिळून जास्तीत जास्त जागा मिळवू, महाराष्ट्रात चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. भाजपवाले पदयात्रा करताहेत. महात्मा गांधींची प्रेरणा सांगताहेत पण हे गांधींच्या विचारांचे मारक आहेत. असंही चव्हाण यांनी यावेळी म्हटलं आहे.
COMMENTS