“नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी !”

“नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी !”

मुंबई – नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत खोटे बोलून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि उध्दव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिलं होतं. परंतु तरीही या प्रकल्पाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली असून काही कंपन्यांसोत करार केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

दरम्यान केंद्र सरकारनं रत्नागिरीतील पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी ३ लाख कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.  रत्नागिरी येथील ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पाची निर्मिती व विकास करण्यासाठी सौदी अरामको आणि एडनॉक  कंपन्यांमध्ये ३ लाख कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्ष-या झाल्या. यानंतर अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

COMMENTS