अशोक चव्हाणांची कोरोनावर मात, आता 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन !

अशोक चव्हाणांची कोरोनावर मात, आता 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन !

मुंबई – काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली आहे. चव्हाण यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशोक चव्हाण यांच्यावर 10 दिवस उपचार सुरु होते. अखेर 10 दिवसानंतर त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर अशोक चव्हाण यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आता चव्हाण हे मुंबईतील घरी 14 दिवस क्वारंटाईन असणार आहेत.

दरम्यान अशोक चव्हाण हे विधानपरिषद निवडणुकीसाठी मुंबईला गेले होते. यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. या निवडणुकीनंतर नांदेडला गेल्यानंतर ते स्वत: होम क्वारंटाईन झाले होते. त्यांनी कुटुंबापासून स्वत:ला वेगळं ठेवलं होतं. नांदेडमधील रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रिपोर्टनंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर 10 दिवसानंतर त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असून त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे.

COMMENTS