मुंबई – खासदार अशोक चव्हाण यांना महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आलं आहे. तसेच राज्यातील प्रदेश कार्यकारिणी कायम ठेवण्याचा निर्णयही आज झालेल्या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेसनं घेतला असून याबाबतचा आदेश काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढला आहे. अखिल भारतीय काँग्रेसमधील बदलानंतर राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व बदलले जाण्याची चर्चा होती परंतु यामध्ये कोणताही बदल केला नसून राहुल गांधी यांनी राज्यातील कार्यकारिणी कायम ठेवली आहे.
राहुल गांधी यांनी राज्यातील कार्यकारिणीवर विश्वास दर्शवला असल्यामुळे अशोक चव्हाण यांची जबाबदारी वाढली आहे. आगामी निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेसला सत्ता मिळवून देण्याचं आव्हान आता अशोक चव्हाण यांच्यापुढे आहे.
COMMENTS