राजस्थान – राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी आज घेतली आहे. तर सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजस्थानचे २२वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. राज्यपाल कल्याण सिंह यांनी या दोघांनाही पद आणि गोपनियतेची शपथ दिली. गेहलोत हे तिसऱ्यांदा राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत. जयपूरच्या ऐतिहासिक अल्बर्ट हॉलमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.
कांग्रेस पार्टी पर विश्वास करने के लिए राजस्थान वासियों का हृदय से आभार।
कांग्रेस के कार्यकर्ताओं और नेताओं को उनके संघर्ष के सफल होने पर हार्दिक बधाई|
राजस्थान की सेवा करना कांग्रेस पार्टी के लिए गौरव की बात है| हम अपनी ज़िम्मेदारी पूरी तरह निभाएंगे|#IndiaTrustsCongress pic.twitter.com/hAWwBf572m
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 17, 2018
या शपथविधी सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, जतीन प्रसाद, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याबरोबरच देशभरातील विरोधीपक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. परंतु मध्यप्रदेशात काँग्रेसला साथ देणाऱ्या बसपा सुप्रीमो मायावती आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यावेळी अनुपस्थित होते.
COMMENTS