रायगडावर मृत्यूपावलेल्या शिवभक्त अशोक उंबरेंच्या कुटुंबियांना शंकरराव बोरकर, प्रतापसिंग पाटील यांच्याकडून आर्थिक मदत !

रायगडावर मृत्यूपावलेल्या शिवभक्त अशोक उंबरेंच्या कुटुंबियांना शंकरराव बोरकर, प्रतापसिंग पाटील यांच्याकडून आर्थिक मदत !

उस्मानाबाद, भूम  – रायगडावरून उतरत असताना दगड डोक्यात पडून मृत्यू झालेल्या शिवभक्त अशोक दादा उंबरे यांच्या कुटुंबियांना शंकरराव बोरकर आणि प्रतापसिंग पाटील यांनी आर्थिक मदत केली आहे. अशोक उंबरे यांची कौटुंबीक परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे कुटूंबाला आधार देण्यासाठी स्वतःच्या वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळून  शिवभक्त अशोक उंबरे यांच्या कुटूंबास एक लाख रुपयांची आर्थिक मदत शिवसेनेचे नेते शंकरराव बोरकर यांनी केली आहे. यावेळी कुटूंबियांचे सांत्वन करुन शिवसेना तुमच्या पाठीशी आहे खचु नका, धीर धरा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, शिवसेना पक्ष प्रमूख उद्धवजी तुमच्या पाठीशी आहेत असं बोरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी कुटूंबाशी सांत्वन करताना बोरकर म्हणाले की उंबरे यांचे कुटूंब हे उघडयावर आले असून काही दिवसांपूर्वीच आजारपणामुळे अशोक उंबरे यांच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर घरातील तरुण मुलाचं निधन झाल्यामुळे या कुटुंबावर मोठं दःख कोसळलं आहे.तसेच कुटुंबाची आर्थिक परिस्थिीती हालाखीची असल्यामुळे त्यांना होईल तेवढी आर्थिक मदत केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अशोक हा  कट्टर शिवभक्त होता. त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला असल्याने त्याच्या कुटूबास आर्थिक मदतीसह शासनाने आणि सगळ्या जनतेने अधार देणे गरजेचं असल्याचंही बोरकर यांनी म्हटलं आहे.

यावेळी शंकरराव बोरकर यांनी रोख स्वरूपात एक लाख रुपये आर्थिक मदत केली आहे. आणि डॉ प्रताप सिंह पाटील यांनी पंचवीस हजार रूपये  चेकव्दारे अशोक उंबरे यांच्या कुटूंबाकडे दिली आहे. तसेच या कुटुंबाला सरकारने मदत करावी असं शिवसेनेचे शंकरराव बोरकर, डॉ. प्रताप सिंह पाटील यांनी केली आहे. त्यावेळी,  आदम शेख,सचिन सोनारीकर  युवा सेनेचे प्रल्हाद आडागळे ,  अड श्रीनिवास जाधवर ,शहरप्रमूख प्रभाकर शेंडगे , बापु अंधारे, संजय चौधरी ,वैभव भारती, विकास बाबर, नितिन गुंजाळ, अमोल अमकर, रमेश काळे , दतात्रय लक्ष्मण काळे , अजित गोडे, सचिन महानवर, सुनिल डांबळे, ऋषिकेश टकले, अमित भागवत यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

COMMENTS