विधानसभा उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ‘यांना’ दिली उमेदवारी !

विधानसभा उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ‘यांना’ दिली उमेदवारी !

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्यावतीने उमेदवारी नामनिर्देशन दाखल करण्यात आले आहे. उमेदवार म्हणून बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येत्या 30 तारखेला विधानसभा उपाध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार असल्याची माहिती आहे.

दरम्यानन गेल्या 4 वर्षापासून हे पद रिक्त असून विधानसभा उपाध्यक्ष पदावर शिवसेनेनं दावा केला होता, पण भाजपनं हे पद रिक्त ठेवलं होतं. आगामी लोकसभा निवडणुका आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे पद भरलं जाणार असून हे पद आता शिवसेनेला दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी भाजपकडून शिवसेनेला पाठिंबा दिला जाणार आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

COMMENTS