पुणे – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित झाली आहे. भाजप-शिवसेनेची सत्ता घालवण्यासाठी सर्व पक्षीयांना एकत्रित घेण्याचा प्रयत्न काँग्रेस – राष्ट्रवादीकडून केला जात आहे. आघाडीत मनसेलाही सोबत घेण्याचा निर्णय दोन्ही पक्षातील नेत्यांनी घेतला असल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मनसेला महाआघाडीमध्ये सामील करण्यास विरोध केला होता, परंतु काँग्रेस आता विधानसभेच्या तोंडावर मोदीविरोधकांची एकजूट बांधण्यासाठी मनसेला सोबत घेण्यास उत्सुक असल्याचं दिसत आहे.
दरम्यान असं असलं तरी जागावाटपावरुन मात्र दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरु झाली असल्याचं दिसत आहे. कारण पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं आठपैकी तब्बल सहा मतदारसंघांवर दावा ठोकला असल्याची माहिती आहे. परंतु काँग्रेसनं मात्र राष्ट्रवादीची ही मागणी फेटाळून लावली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आघाडीत जागावाटपाआधीच बिघाडी होण्याची चिन्हं दिसत आहेत.
COMMENTS