मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत तीन ते चार दिवसांपूर्वीच प्रवेश केलेला नेता पुन्हा शिवसेनेत घरवापसी करणार आहे. पालघरचे शिवसेनेचे बंडखोर आमदार अमित घोडा हे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. घोडा यांनी तीन दिवसापुर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र तीनच दिवसांत ते राष्ट्रवादी सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिला आहे. घोडा हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.
अमित घोडा यांनी शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीनं त्यांना उमेदवारीही जाहीर केली होती. परंतु शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाख शिंदे यांनी घोडा यांच्यावर दबाव आणल्यामुळे ते आता पुन्हा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे घोडा यांच्या आगामी भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान अमित घोडा हे पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तसेच ते अनुसुचित जमाती कल्याण समितीचे सदस्य देखील आहेत. त्यांनी फेब्रुवारी 2016 मध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांचा पराभव केला होता. परंतु या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून माजी मंत्री राजेंद्र गावित यांना तिकीट दिल्याने अमित घोडा नाराज होते. परंतु त्यांची नाराजी दूर करण्यात आली असल्याची चर्चा आहे.
COMMENTS