मुंबई – विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच विविध संस्थांनी आपला ओपिनियन पोल जाहीर केला आहे. सी व्होटर आणि एबीपी माझानं केलेल्या सर्व्हेमध्ये विधानसभेला युतीने निवडणूक लढल्यास महायुतीला 205 जागा मिळतील तर महाआघाडीला 55 आणि इतर 28 जागा मिळतील असं या सर्व्हेत म्हटलं आहे. तसेच
युती किंवा आघाडीचं गणित बिघडलं तर इतर पक्षांना 64 जागा मिळतील असंही या सर्व्हेतून समोर आलं आहे.
तसेच सी व्होटर आणि एबीपी माझाच्या सर्व्हेनुसार युती झाली नाही तर भाजपला 144 तर शिवसेनेला 39 जागा मिळतील. तर काँग्रेसला 21 आणि राष्ट्रवादीला 20 जागा मिळतील असा अंदाज सर्व्हेत वर्तवला आहे. तसेच या सर्व्हेत मनसेला विधानसभा निवडणुकीत शून्य जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान टीव्ही नाईन मराठीनं केलेल्या सर्व्हेत महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 पैकी 217 जागा भाजप-शिवसेना युतीला मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला केवळ 60 आणि इतर पक्षांना 11 जागा मिळण्याचे संकेत वर्तवले आहेत. विधानसभेसाठी विदर्भात आज निवडणुका झाल्यात तर 62 पैकी महायुतीला तब्बल 51 जागा मिळू शकतात. तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला केवळ 11 जागांवर समाधान मानावं लागू शकतं असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.
COMMENTS