राज्यात कोणाचं सरकार येणार?, कोणाला किती जागा मिळणार?, पाहा विविध संस्थांचा ओपिनियन पोल!

राज्यात कोणाचं सरकार येणार?, कोणाला किती जागा मिळणार?, पाहा विविध संस्थांचा ओपिनियन पोल!

मुंबई – विधानसभा निवडणूक दोन दिवसांवर आली आहे. 288 जागांसाठी  एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, तर महाराष्ट्राचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी विविध संस्थांनी आपला ओपिनियन पोल डाहीर केला आहे. या अंदाजानुसार पुन्हा एकदा राज्यात भाजप-शिवसेना युतीचं सरकार येणार असल्याचं दिसत आहे. यामध्ये विधानसभेच्या  288 पैकी 200 पेक्षा जास्त जागा भाजप-शिवसेना युतीला मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला केवळ 50 ते 60 तर अपक्षांना 5 ते 11 जागा मिळण्याचे संकेत आहेत.

नेता सर्वेक्षण ओपिनियन पोल

महायुती – 211 जागा
महाआघाडी – 69
बविआ – 4
एमआयएम – 2
मनसे – 1
स्वाभिमानी – 1

जन की बात ओपिनियन पोल

महायुती – 225-232
महाआघाडी – 55
अपक्ष/इतर – 33 जागा

सी वोटर ओपिनियन पोल

महायुती – 200
महाआघाडी- 55
अपक्ष/इतर – 33 जागा
जन की बात

नेता मतदानाआधीचा पोल

भाजप – 142 ते 147
शिवसेना – 83 ते 85
काँग्रेस – 21 ते 23
राष्ट्रवादी – 27 ते 29

2014 मधील पक्षीय बलाबल

एकूण जागा – 288

भाजप – 122

शिवसेना – 63

काँग्रेस – 42

राष्ट्रवादी – 41

COMMENTS