मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का बसला असुन उमेदवारी मिळाली नाही म्हणून शिवसेना खासदाराच्या मुलाने बंडखोरी केली आहे. शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव चेतन लोखंडे यांनी पक्षाकडे श्रीरामपूर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने त्यांना डावलून नुकताच काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाऊसाहेब कांबळे यांना तिकीट दिलं. त्यामुळे नाराज झालेल्या चेतन लोखंडे यांनी श्रीरामपूरमधून अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान त्याचबरोबर तिकीट न मिळाल्याने शिवसेना-भाजपमध्ये नाराज झालेल्या काही नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वाट धरली आहे. तर काही अपक्ष उमेदवारी लढत आहे. तसेच काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत देखील होणार असल्याचं दिसत आहे.
साताऱ्यातील माण विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेची मैत्रीपूर्ण अनोखी लढत होणार आहे. जयकुमार गोरे यांनी भाजपमधून तर त्यांचे सख्खे भाऊ शेखर गोरे यांनी शिवसेनेतून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे माण मतदारसंघात भाजप- शिवसेनेचा सामना रंगणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS