नाशिक – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. परंतु मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली असल्याचं दिसत आहे. नाशिकमध्ये ठिकठिकाणच्या भाजप कार्यालयासमोर शिवसेनेने पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टरमध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांचे फोटो लावले असून त्यावर ‘मुख्यमंत्री शिवसेना-भाजपा युतीचाच होणार, याचा अर्थ शिवसेनेचाच होणार‘ असे लिहिले आहे. या पोस्टरखाली नाशिकच्या नगरसेविका किरण गामणे (दराडे) यांचाही फोटो पाहायला मिळत आहे. या पोस्टरमुळे शिवसेना-भाजपमध्ये चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
जरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री कोणाचा यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु झाला आहे. कालच भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी यांनी सध्या महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री आहे आणि पुन्हा देखील भाजपचाच मुख्यमंत्री होईल. आम्ही महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक लढवत आहोत. ही निवडणूक आम्ही युतीतच लढू, मात्र मुख्यमंत्री भाजपचाच होणार असं वक्तव्य सरोज पांडे यांनी केले होते. या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये आज पोस्टर लावण्यात आले असल्याची चर्चा आहे.
COMMENTS