नवी दिल्ली – राजस्थान आणि तेलंगण विधानसभेसाठी आज मतदान पार पडत आहे. तेलंगणमध्ये ११९ तर राजस्थानमध्ये विधानसभेच्या १९९ जागांसाठी मतदान होणार आहे. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीसमोर काँग्रेसचे आव्हान आहे तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सरकारसमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस, भाजप आणि टीआरएस या तीन पक्षांमध्ये चुरस पहायला मिळत आहे.
तेलंगणा विधानसभा
तेलंगणमध्ये २.८० कोटी नागरिकांकडे मतदानाचा अधिकार आहे. राज्यात एकूण ३२,८१५ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. राजस्थानात १९९ जागांसाठी २,२७४ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात एकूण ५१,६६७ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
Telangana: State Irrigation Minister T Harish Rao casts his vote in polling booth no. 102 in Siddipet constituency. #TelanganaElections2018 pic.twitter.com/2q2tqbgoXl
— ANI (@ANI) December 7, 2018
राजस्थानात ४.७४ कोटी लोकांकडे मतदानाचा अधिकार आहे. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने इथे १६३ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला फक्त २१ जागांवर समाधान मानावे लागले होते. राजस्थानात दर पाचवर्षांनी प्रस्थापित सरकार विरोधात एक लाट असते. ती रोखण्याचे मुख्य आव्हान वसुंधरा राजेंसमोर आहे.या दोन्ही राज्यात कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS