मुंबई – आई, बाबा, दादा, ताई, तुम्ही मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा असा संदेश मुंबई शहर जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या पालकांना लेखी प्रतिज्ञापत्रद्वारे देत आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी अधिक वाढविण्यासाठी हा एक अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविला जात आहे.
हे प्रतिज्ञापत्र शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिले जात आहेत. त्यानंतर विद्यार्थी आपले पालक व कुटूंबीय यांना दि. 21 ऑक्टोंबर 2019 रोजी मतदान करा आणि राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा. असा संदेश देवून कुटूंबियांची प्रतिज्ञापत्रावरे स्वाक्षरी घेत आहेत. आणि आपल्या शाळेमध्ये जमा करत आहेत.
या उपक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या 250 शाळा आणि खाजगी 50 शाळा अशा 300 शाळांनी सहभाग नोंदविला आहे. लेखी प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर दि. 21 ऑक्टोबर 2019 रोजी विद्यार्थीच आपल्या आई बाबांना मतदान केल का? असा प्रश्न विचारतील आणि मतदान नाही केलं तर विद्यार्थी आई बाबांनाच मतदान का नाही केले ? असा प्रश्न उपस्थित करतील.
असा अनोखा उपक्रम मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात येत आहे. या उपक्रमात आत्तापर्यंत 60 हजार प्रतिज्ञापत्र विद्यार्थ्यांना देण्यात आली असून 1 लाख प्रतिज्ञापत्र विद्यार्थ्यांमार्फत देण्यात येणार आहेत.
ही लेखी प्रतिज्ञापत्र शाळेमध्ये जमा करुन घेतली जात आहेत आणि त्यांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात येतआहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.
COMMENTS